kian pawaskar about narayan rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

नारायण राणेंचा अभ्यास पाहून भाजपने जाहीरनामा समितीचे सदस्यपद दिले!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जानेवारी 2019

भाजपने त्यांचा अभ्यास पाहून आणि राजकारणातील पकड पाहून त्यांना जाहीरनामा सदस्यपद दिले आहे.

सावंतवाडी (रत्नागिरी) : नारायण राणे यांची भाजपच्या जाहीरनामा समिती सदस्यपदी निवड झाली. त्यामुळे आमच्याकडून आता 'फुल स्टॉप' आहे, असा टोला लगावत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी युती करण्यासंदर्भात राष्ट्रवादीकडून कोणताही विचार झाला नव्हता. ते भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्‍न येत नाही. आता तर ते जाहीरनामा समितीचे सदस्य झाले आहेत. त्यामुळे आमच्याकडून "फुल स्टॉप' आहे, असे पावसकर म्हणाले. भाजपने त्यांचा अभ्यास पाहून आणि राजकारणातील पकड पाहून त्यांना जाहीरनामा सदस्यपद दिले आहे. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. 
 

संबंधित लेख