khot and raju shetty | Sarkarnama

खोत, हिम्मत असेल तर माढयातून लढा - मादनाईक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

जयसिंगपूर : वारणा येथील ऊस परिषदेत मंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना सांगली जिल्ह्यातन लढण्याचे आव्हान दिले आहे. मात्र मंत्री खोत तुमच्यात हिम्मत असेल तर माढयातून तुम्ही लढा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हातकणंगलेमधून उभे करा, असे आव्हान स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांनी केले. 

मदनाईक म्हणाले, कोणी कुठून लढावे, हे कोणी सांगण्याची गरज नाही. योग्यवेळी योग्य निर्णय होईल. खासदार शेट्टी कोठुनही लढू शकतात. त्याची काळजी, तुम्ही करू नका, असा टोला त्यांनी खोत यांना लगावला. स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत सर्वच नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. मंत्री खोत यांनी घेतलेली ऊस परिषद ही भाजप परिषद होती. खरी ऊस परिषद ही जयसिंगपुरची आहे. हीच परिषद उसाचा दर ठरवणार असल्याचे, मादनाईक यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख