khot and farmers | Sarkarnama

बाजार समित्या राजकीय दुकानदारीचे अड्डे - सदाभाऊ खोत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे : राज्यातील बाजार समित्यांनी स्थापनेपासून आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही. गेल्या काही दशकांपासून त्या केवळ प्रस्थापित राजकारण्यांच्या बगलबच्यांचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बगलबच्यांना पोसणे आणि त्यांची सोय करणे एवढेच बाजार समित्यांचे काम राहिले आहे. त्यामुळे शेतकरीहितापेक्षा राजकीय दुकानदारी करण्याचेच काम बाजार समित्यांर्फत करण्यात येत असल्याची टीका पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी पुण्यात केली. 

केंद्र आणि राज्य सरकारने व्यापाराबाबत खुले धोरण स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांना त्यांना आवश्‍यक सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत. तरंच कुठे शेतकऱ्यांची उत्पादने ही स्पर्धेच्या जगात टिकाव धरतील. यासाठी बाजार समित्यांनी जगाच्या स्पर्धेत उतरले पाहिजे. पण त्या शेतकरी आणि आडत्यांसाठी सुविधा पुरवत नसतील आणि नुसताच सेसकर आकारत असतील तर, ते साफ चुकीचे आहे. यातूनच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे सेसला दुसरा पर्याय शोधला पाहिजे. यासाठी व्यापाऱ्यांना व्यापारासाठी दिलेल्या जागांवर मेंटेनन्स घेता येईल का, हा पर्याय तपासून पहावा, असा सल्लाही खोत यांनी यावेळी बाजार समित्यांना दिला. 

संबंधित लेख