आमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे

 आमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे

देऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरुद्ध प्रचंड घोषणा देण्यात आल्या. शासनाने नुकतेच देऊळगावराजा तालुक्‍यातील चार मंडळ दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट केले. मात्र देऊळगाव मही मंडळ सदर यादीतून वगळण्यात आले होते. 

देऊळगाव मही मंडळातील 15 गावे प्रचंड भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असतांना हे मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. सलग चार वर्षापासून तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी तर भीषण दुष्काळाच्या यातना शेतकरी सोसत आहे. शासनाच्या या धोरणाविरुद्ध आज स्वाभिमानी संघटनेचे बबनराव चेके यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासनाविरुद्ध प्रचंड घोषणा देण्यात आल्या. 

देऊळगाव मही मंडळावर शासनाने अन्याय केल्या त्या भावना व्यक्त करत आमदार खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे साकडे घालावे अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. दरम्यान तहसीलदार दीपक बाजड यांनी स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर, जगदीश कापसे, मोरेश्वर मीनासे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस शेख जुल्फिकार, संतोष शिंगणे, विष्णू देशमुख, समाधान देवखाणे, अरविंद चेके, अंबादास बुरकुल, गणेश शिंगणे, भगवान मुंडे, स्वप्निल मुंडे, सचिन साळवे, रतन चेके यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. 

 आंदोलन राष्ट्रवादी पुरस्कृत : दीपक बोरकर 
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा यासाठी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे शासनाशी भांडत आहोत. शेतकऱ्यांसाठी आमचा प्रामाणिकपणे पाठपुरावा सुरू असताना एक मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची राहिले आहे. नेमकं हाच मुद्दा घेऊन विरोधक राजकारण करीत आहेत. स्वाभिमानीचे आंदोलन स्टंटबाजी असून राष्ट्रवादी पुरस्कृत आहे असा आरोप शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com