खेडचे माजी आमदार दिलीप मोहितेंना न्यायालयाकडून चार हजारांचा दंड

खेड तालुक्याचे (जि.पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना खेड न्यायालयाने मंगळवारी चार हजार रुपयांचा दंड केला. पुणे जिल्हा परिषदॆतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील व खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर यांच्याविरुद्ध मोहितेंनी 13 वर्षापुर्वी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावरील सुनावणीला ते स्वत:च वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली.
खेडचे माजी आमदार दिलीप मोहितेंना न्यायालयाकडून चार हजारांचा दंड

पिंपरीः खेड तालुक्याचे (जि.पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना खेड न्यायालयाने मंगळवारी चार हजार रुपयांचा दंड केला. पुणे जिल्हा परिषदॆतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील व खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर यांच्याविरुद्ध मोहितेंनी 13 वर्षापुर्वी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावरील सुनावणीला ते स्वत:च वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली.
  
२००६ मध्ये मोहिते यांनी बुट्टे आणि जवळेकर यांच्याविरोधात अनुक्रमे ५ व २ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा हा दिवाणी दावा दाखल केलेला आहे. गेली १3 वर्षे तो सुरु आहे. त्यात काल मोहितेंची उलटतपासणी होणार होती. परंतू, मोहिते गैरहजर होते. त्यांनी अर्ज दिला, की त्यांच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने ते न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्याला प्रतिवादी बुट्टे व जवळेकरांचे वकील अॅड. मिलींद पवार, अॅड. विजय रेटावडे व अॅड. विश्वास खराबे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, मोहिते यांनी दाखल केलेल्या  दाव्यात ते स्वतःच गैरहजर राहतात. न्यायालयाचा वेळ घालवण्यासाठी तसेच प्रतिवादी बुट्टे व जवळेकर यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हा दावा दाखल करण्यात आला आहे. हा युक्तिवाद वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के.एच.पाटील यांनी मान्य करीत मोहितेंना दंड केला.त्यातील दोन हजार पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला तर बुट्टे व जवळेकर यांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचा आदेश दिला. त्यानंतर मोहिते यांना न्यायालयात साक्ष द्यायची नसेल तर हा दावा आजच निकाली काढावा अशी विनंती करणारा अर्ज बुट्टे व जवळेकर यांनी न्यायालयात दाखल केला. त्यावर 14 तारखेला रोजच्या रोज सुनावणी घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच 14 फेब्रुवारीला मोहितेंना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. 

हा दावा दाखल केला त्यावेळी बुट्टे व मोहिते हे एकाच पक्षात म्हणजे राष्ट्रवादीत होते. मात्र, त्यांचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात आरोप, प्रत्यारोप झाले होते. खेडच्या सेझवरुन मोहिते यांच्यावर बुट्टे व जवळेकर यांनी आरोप केले होते. त्यातून हा खटला दाखल झाला आहे. जवळेकर हे कॉंग्रेसमध्ये होते. दरम्यान, बुट्टे हे भाजपमध्ये गेले. तर, जवळेकर यांनीही हाताची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतला. सध्या खेडच्या राजकारणात या तिघांनाही महत्व आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com