khandala tahsildar | Sarkarnama

खंडाळ्याचे तहसीलदार तळपे वादात ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 जून 2017

तहसिलदाराला हाताशी धरून विहिरीसह जमीन बळकावण्याचा प्रकार खंडाळा तालुक्‍यातील धावडवाडी येथे उघड झाला आहे. यासंदर्भात सदर जमिनीची मालकी असलेल्या मिराबाई तुळशीराम सोनावणे यांनी खंडाळा तहसिल कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासकिय यंत्रणेला जाग आली आहे. 

सातारा : तहसिलदाराला हाताशी धरून विहिरीसह जमीन बळकावण्याचा प्रकार खंडाळा तालुक्‍यातील धावडवाडी येथे उघड झाला आहे. यासंदर्भात सदर जमिनीची मालकी असलेल्या मिराबाई तुळशीराम सोनावणे यांनी खंडाळा तहसिल कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासकिय यंत्रणेला जाग आली आहे. 

तहसिलदार तळपे यांनी श्रीमती सोनावणे यांची बाजु न ऐकताच या जमिनीबाबत विरोधी पक्षाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे न्यायासाठी सोनावणे यांनी खंडाळा तहसिल कार्यालयासमोरच बेमुदत उपोषण सुरू केले. तीन दिवसाच्या उपोषणानंतर प्रशासकिय यंत्रणा जागी झाली. यामध्ये प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी मध्यस्थी करत सदर जमिनीच्या बिगर शेतीला स्थगिती दिल्याचे सांगत सोनावणे यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच विहिर परत करण्याचे व तहसिलदारांच्या निर्णयाविरोधात प्रांतांच्या कोर्टात अपील करण्याच्या शर्तीवर सदर महिलेने उपोषण मागे घेतले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य शोभा जाधव, पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत उपस्थित होते. तहसिलदार शिवाजी तळपे यांच्यावर कारवाई होण्यासाठी जनता क्रांती दलाच्यावतीने येत्या 27 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. 

संबंधित लेख