khaire and state government | Sarkarnama

हिंदुत्वासाठी शिक्षा भोगायला तयार - चंद्रकांत खैरे

जगदीश पानसरे
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मी लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे जनतेच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणे, त्यांच्या हाकेला ओ देणे हे मी माझे कर्तव्य समजतो, अतिक्रमण ठरवून पाडण्यात येणारी मंदिर वाचवण्यासाठी लोकांच्या विनंतीवरून मी तिथे गेलो. मी शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षाचा खासदार आहे. हिंदुत्ववादी सरकारकडूनच अशा प्रकारची कारवाई होणार असेल तर हिंदुत्वासाठी मी शिक्षा भोगायला तयार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. 

चंद्रकांत खैरे म्हणाले, देशात आणि राज्यात देखील हिंदुत्ववादी सरकार आहे. अशावेळी पाडण्यात येणारी मंदिरे वाचवण्यासाठी मी गेलो यात काही चुकले असे मला वाटत नाही. मुळात वाळूंजच्या भागात कारवाई करण्यात आली, ती मंदिरे अतिक्रमण नव्हती, एमआयडीसीत निवासी घरे बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा महिलांनी अक्षरशः शंभर शंभर रुपये गोळा करून मंदिरे उभारली होती. तिथे रोज धार्मिक विधी, पूजा, भजन चालायचे. अचानक अतिक्रमण ठरून ते पडण्यात आले तेव्हा महिला रडल्या. हे सगळं क्‍लेशदायक होते असे त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे गेलो तर काय चुकले. साईबाबा मंदिर, महादेवाचे मंदिर , सोनार समाजाचे नरहरी मंदिर त्यावेळी पाडण्यात आले. ते अतिक्रमण नव्हते, आणि ते वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून शिक्षा करणार असाल तर खुशाल करा. 

शहरात महापालिकेने जेव्हा धार्मिक स्थळाच्या संदर्भात कारवाई केली तेव्हा आम्ही अनेक चर्च, दर्गे, बुद्धविहार, मंदिरे वाचवली, भेदभाव केला नाही. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार आणि त्यातील हिंदुत्ववादी मंत्री जर माझ्यावर कारवाई करणार असेल तर हे योग्य नाही. राजकीय हेतूने माझ्यावर कारवाई केली जात असेल तर या सरकारच्या खोट्या हिंदुत्ववाचा चेहरा मी जनतेसमोर आणेन. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना मंदिरावर कारवाई केली जाते मुळात हेच दुर्दैवी आहे. 
 
संबंधित लेख