khaire and jalil | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

"एमआयएम' ही निझामाची औलाद, म्हणूनच संभाजीनगर नावाला त्यांचा विरोध- चंद्रकांत खैरे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : धर्माभिमानी संभाजी महाराजांचा प्रचंड छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या क्रूर औरंगजेबाचे नाव या शहराला असता कामा नये. हाल, अत्याचार सहन केले पण संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही आणि म्हणून या शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे ही तमाम हिंदूची इच्छा आहे. पण निझामाची औलाद असलेल्या एमआयएम आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार इम्तियाज जलील यांना ते सहन होत नाही, यातूनच त्यांनी "संभाजीनगर' नावाला विरोध सुरू केला असल्याची टीका शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलतांना केली. 

उत्तर प्रदेशात सुरू झालेले नामांतराचे लोण आता महाराष्ट्रातही पोहचले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि पुणे शहराचे जिजापूर असे नामकरण करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 95 ते 99 च्या काळातील युती सरकारने औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर करण्यास मान्यता दिली होती. पण यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून या शहरांच्या नामांतराचा प्रश्‍न पडून होता. 

अलाहाबादचे प्रयागराज झाल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर करा अशी मागणी नव्याने शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. या मुद्यावरून आता राजकारण सुरू झाले असून एमआयएमने खैरे यांच्या मागणीला विरोध दर्शवत त्यांच्यावर "चांगले काम दाखवा' असे आव्हान देत हल्ला चढवला आहे. त्याला खैरे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत खैरे म्हणाले, संभाजीनगर नावाला विरोध करण्यासाठी इम्तियाज जलील कचऱ्याचा प्रश्‍न उकरून काढत आहते. मी काय विकास केला हे विचारण्याचा त्यांना अधिकार नाही, जनतेला तो दिसतो. तुम्ही ज्या भागाचे प्रतिनिधित्व करता, राजे म्हणून मिरवता त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे ते ही त्यांनी बघितले पाहिजे. उगाच मला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये. हिंमत असेल तर इम्तियाज जलील यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. 

संबंधित लेख