khaire and god worship | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

खासदार चंद्रकांत खैरे 27 वर्षापासून करतात दाम्पत्य पूजन...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे गेल्या 27 वर्षांपासून श्रावण महिन्यात दाम्पत्य पूजन करतात. वेरूळच्या घृष्णेश्‍वराला अभिषेक आणि महाप्रसादाच्या आयोजनाची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. शहरातील बाळकृष्ण मंदिरात सर्वप्रथम 101 दाम्पत्याचे पूजन आणि त्यांना भोजन देण्याचा संकल्प खैरे यांनी केला होता. 27 वर्षानंतर ही संख्या तीन हजारांवर पोहचली आहे. 

गेल्या कित्येक वर्षात त्यांनी चतुर्थीला राजुरच्या गणपतीचे आणि श्रावण मासात घृष्णेश्‍वराचे दर्शन कधीही चुकवलेले नाही. औरंगाबादच्या डेक्कन फ्लोअर मिलमध्ये सुपरवायझर ते आमदार, मंत्री, खासदार आणि शिवसेना नेतेपदापर्यंत खैरे यांचा राजकीय प्रवास झाला. आपल्या या वाटचालीमध्ये थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद आणि देवाची कृपा असल्याचे खैरे यांना वाटते

101 दाम्पत्यांचे पूजन आणि त्यांना भोजन देण्यासाठी त्यांनी बाळकृष्ण मंदिराची निवड केली.या निमित्ताने वेरूळच्या घृष्णेश्‍वर मंदिरात संपूर्ण खैरे कुटुंबाच्या हस्ते अभिषेक केला जातो. 

संबंधित लेख