khaire and cm | Sarkarnama

योगींना जमले ते फडणवीसांना का नाही ? - चंद्रकांत खैरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले. योगींना जमले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का जमत नाही? असा रोखठोक सवाल करत शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करा अशी मागणी केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गटप्रमुख व लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात हिंदुत्व आणि शहराच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. अलाहबादचे प्रयागराज असे नामकरण झाल्याचा दाखला देत खैरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला 

औरंगाबादच्या नामकरणासाठी आपण अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण बघू, करू असे सांगत त्यांनी बोळवण केली. लोकसभेत देखील आपण या विषयावर बोललो, पाठपुरावा केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जे जमते ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का नाही? असा प्रश्‍न उपस्थित करतांनाच त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केल्यास शिवसेना अधिक मजबूत होईल म्हणूनच ते केले जात नसल्याचा आरोप देखील केला. 

मराठवाड्यात चाळीस जागा निवडून आणणार 
आगामी विधानसभा निवडणूकीत मराठवाड्यातील चाळीस जागा निवडून आणायच्या आहेत, त्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिक व महिला आघाडीला केले. ज्या प्रमाणे उत्तर प्रदेश देशाला दिशा देण्याचे काम करते तसेच मराठवाडा महाराष्ट्राला दिशा दाखवण्याची भूमिका भविष्यात करेल असा विश्‍वास देखील खैरेंनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभेच्या जागा जिंकायच्या आहेत, भाजपने कितीही पैसा वाटला तरी आपण या जागा जिंकणारच असा दावा करतांनाच भाजपकडे एवढा पैसा कुठून आणला, भ्रष्टाचारातूनच ना? त्यांना मुठमाती द्या असे आवाहन देखील खैरे यांनी केले. 

संबंधित लेख