Khadse supporters to post black images on social media for 3 days | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

खडसे समर्थकातर्फे उद्यापासून तीन दिवस सोशल मिडीयावर  "ब्लॅक डेज' 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 17 मे 2017

. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस धुळे, नंदुरबार खानदेश दौऱ्यावर असतांना खडसे समर्थकांनी हे अनोखे आंदोलन जाहिर केले आहे.

जळगाव: राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना मंत्रीमंडळातून बाहर पडून एक वर्षे पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी याच मे महिन्यात त्यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या निषेधार्थ खडसे समर्थकांनी उद्या (ता. 18) पासून तीन दिवस सोशल मिडीयावर ब्लॅक डेज पाळण्याचे आवाहन केले आहे. 

"टीम सपोर्ट एकनाथराव खडसे 'या नावाने खडसे समर्थ एकत्र आले आहेत. त्यांनी सोशल मिडीयावर आवाहन केले आहे, कि खडसे यांच्यावर मागील वर्षी याच कालखंडात खोटे आरोप करण्याची सुरूवात करण्यात आली होती. त्याला एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यांच्या निषेध म्हणून सर्वानी सोशल मिडीयात "ब्लॅक फोटो 'अपलोड करावयाचे आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस धुळे, नंदुरबार खानदेश दौऱ्यावर असतांना खडसे समर्थकांनी हे अनोखे आंदोलन जाहिर केले आहे. सोशल मिडीयावर अनोखे आंदोलन होत असल्यामुळे त्यांना किती प्रतिसाद मिळणार याकडे आता लक्ष आहे.

संबंधित लेख