khadase | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

उघडे फिरणाऱ्यांना "नाड्या' बांधायला आपणच शिकविले - खडसे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017

जळगाव : कर्तृत्ववान माणसाला कामाचे श्रेय घेण्याची गरज नसते त्याचे कामच जनतेला दिसते. परंतु ज्यांच कर्तृत्वच नाही अशीच माणसे प्रसिद्धी करून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना काहीच कळत नव्हते, जे उघडे फिरत होते त्यांना आपण "नाड्या'बांधायला शिकविले असा टोला राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र जळगावातील एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी काल नाव न घेता "माझ्यामुळेच जिल्ह्यात यश आले, मीच केलं असे म्हणण योग्य नाही' असे वक्‍तव्य कोणाचेही नाव न घेता केलं होते. 

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुरूवारी (ता.18) बैठक झाली त्यात राज्याचे जलसंपदामंत्री महाजन यांनी कोणाचेही नाव न घेता "जे करतो ते मीच करतो माझ्यामुळेच जिल्ह्यात यश आले मीच केले असे म्हणणे योग्य नाही' असे उपरोधिक सुरात वक्तव्य केले होते.

महाजन यांच्या वक्‍तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यातही गुपचूप चर्चा सुरू होत असतानाच राज्याचे माजी महसूल मंत्री व भाजपचे नेते खडसे यांनीही कोणाचेही नाव न घेता टोला लगावला.

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर  पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाचे काम कोणी केले हे लहान मुलगाही सांगू शकेल. केलेले कर्तृत्व सर्वानांच दिसत त्यांची प्रसिद्ध करायची गरज राहत नाही. परंतु ज्यांचे कर्तृत्वच नाही, ते काम दाखवूच शकत नाही. त्यामुळे त्यांना "क्रेडिट'घेण्याची गरज असते. जिल्ह्यातील अनेक जण नुसतेच फिरत होते, त्यांना चड्यांच्या "नाड्या'बाधांयलाही आपण शिकविले आहे. असो त्यांनाही आपल्या शुभेच्छा आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पाटबंधारे मंत्री असताना जिल्ह्यात सिंचनाची कामे आपल्याच काळात मोठ्या प्रमाणात झाली, तसेच आताही मंत्रिपदाच्या काळात आपण शेतकऱ्यांचे प्रश्‍न आपण सोडविले असा दावाही त्यांनी केला 

संबंधित लेख