keral voilance president kovind | Sarkarnama

केरळमधील हिंसाचार रोखण्यासाठी उपाय आवश्‍यक : कोविंद 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

तिरुअनंतपुरम : केरळमधील राजकीय हिंसाचार रोखण्यासाठी उपाय करणे आवश्‍यक आहे, राज्यघटनेमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सांगितले. 

केरळ विधानसभेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. "एकमेकांशी चर्चा, एकमेकांच्या मतांचा आदर हे केरळमधील समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. असे असूनही याच राज्यात राजकीय हिंसाचार बळावतो आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आणि विचारवंतांनी अशा अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पावले उचलायला हवीत,' असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख