kejriwal in igatpuri | Sarkarnama

इगतपुरी : केजरीवाल म्हणतात, मौन पाळा! 

संपत देवगिरे 
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या नाशिकच्या इगतपुरी येथी धम्मगिरी केंद्रात विपश्‍यना करीत आहेत. विपश्‍यनेला आलेले त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हाताने खुण करीत ते म्हणतात मौन पाळा ! 

नाशिकः दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या नाशिकच्या इगतपुरी येथी धम्मगिरी केंद्रात विपश्‍यना करीत आहेत. विपश्‍यनेला आलेले त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हाताने खुण करीत ते म्हणतात मौन पाळा ! 

सोमवारी त्यांचे येथे आगमन झाले. राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेत असणारे अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी विपश्‍यना केली आहे. आगामी दहा दिवस ते येथे विपश्‍यना करतील. एरव्ही सदैव फाड फाड विधाने अन्‌ भाषणे करण्यासाठी प्रसिध्द असलेले केजरीवाल यांना येथे मात्र दहा दिवस मौन पाळावे लागणार आहे. सकाळी सहाला सुरु होणाऱ्या दिनचर्येत साधा आहार महत्त्वाचा आहे. मर्यादीत मीठ, तिखट व तेल असलेला त्यांचा आहार आहे. अनेकांना त्यांच्याशी संवाद साधण्याचा मोह आवरत नाही. सायंकाळी भोजनाला एकत्र जमल्यावर, सामुहीक मार्गदर्शन प्रसंगी त्यांच्याशी संवाद साधतात. यावेळीही ते मौनच राहणे पसंत करतात. 

संबंधित लेख