kedgao's kotkar joins bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

केडगावमध्ये निवडणुकीआधीच काँग्रेस चित; कोतकर भाजपमध्ये!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सर्वानाच भाजपने उमेदवारी दिल्याने काँग्रेस चारीमुंड्या चित झाले आहे.

नगर : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीच्या अखेरच्या टप्प्यात शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील सर्व कोतकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

काँग्रेसच्या १६ व १७ प्रभगांतून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सर्वानाच भाजपने उमेदवारी दिल्याने काँग्रेस चारीमुंड्या चित झाले आहे.

केडगावमधील भाजपचे उमेदवार : सुनील कोतकर, मनोज कोतकर, सविता कराळे, गणेश सातपुते, सुनीता कांबळे, लता बलभीम शेळके, राजकुमार कांबळे व अश्विनी गुंड यांना उमेदवारी दिल्याचे समजते. तथापि, रात्री उशिरापर्यंत नेमका कोणला एबी फाॅर्म दिले, याबाबत संदिग्धता होती.

महापालिकेसाठी काँग्रेसचे नेतृत्त्व करणारे सुजय विखे पाटील यांना हा मोठा धक्का आहे. 

संबंधित लेख