केडगाव हत्याकांडातील संशयित आरोपीने दिले एमपीएससीचे पेपर

केडगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी संदीप गुंजाळ याने आज नगरमध्ये महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचे पेपर दिले. न्यायालयाच्या परवानगीने नगरच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलमधील रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कुलमधील केंद्रात त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
केडगाव हत्याकांडातील संशयित आरोपीने दिले एमपीएससीचे पेपर

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी संदीप गुंजाळ याने आज नगरमध्ये महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचे पेपर दिले. न्यायालयाच्या परवानगीने नगरच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलमधील रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कुलमधील केंद्रात त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

केडगाव दुहेरी हत्याकांडात शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली. या खटल्यात संदीप गुंजाळ आरोपी आहे. तो नाशिकच्या करागृहात होता. कारागृहात असताना त्याने राज्य सेवा पूर्व परीक्षेचे फार्म भरले होते. त्यानुसार आज नगरच्या हायस्कुलमध्ये त्याचा नंबर आला आहे. सकाळी दहा ते १२ व दुपारी तीन ते पाच या वेळात त्याचे दोन पेपर होते. त्याने पहिला पेपर दिल्यानंतर दुसऱ्या पेपरला बसला आहे. दोन्ही पेपर झाल्यानंतर त्याची पुन्हा पोलिस बंदोबस्तात कारागृहात रवानगी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com