निलेश राणे यांच्याकडे पुरावे असतील तर सादर करावेत - केदार दिघेंचे आव्हान

निलेश राणे यांनी निवडणुकीच्या वेळेस संभ्रभ निर्माण करू नये असे प्रतिपादन आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी केले आहे. काल निलेश राणे यांनी आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंनी संपवलं असा आरोप निलेश राणे यांनी केला होता. त्याला केदार दिघे यांनी उत्तर दिलं आहे. निलेश राणे यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांच्याकडे पुरावे असतील तर सादर करावेत - केदार दिघेंचे आव्हान

ठाणे : निलेश राणे यांनी निवडणुकीच्या वेळेस संभ्रभ निर्माण करू नये असे प्रतिपादन आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी केले आहे. काल निलेश राणे यांनी आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरेंनी संपवलं असा आरोप निलेश राणे यांनी केला होता. त्याला केदार दिघे यांनी उत्तर दिलं आहे. निलेश राणे यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत, असे केदार दिघे यांनी म्हटले आहे.

दहा वर्षातील साडेचार वर्षे गृहखाते शिवसेनेकडे आहे. मग तपास का नाही केला? आम्ही मर्यादा पाळली, बाळासाहेबांबद्दल बोललो नव्हतो. राणेंवर गटरछाप खासदार बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही. आनंद दिघेचे काय झाले? कट कसा रचला गेला? त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये कसा दाखवला गेला? ज्या दोन शिवसैनिकांना हे सहन झाले नाही, त्यांना बाळासाहेबांच्या आदेशावरुन कसे संपवले गेले? हे जाहीर करावे लागेल, असे निलेश राणे काल पत्रकार परिषदेत म्हणाले होते, त्यावर केदार दिघे यांनी त्यांना आव्हान दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com