kbc prakash amte | Sarkarnama

"कौन बनेगा करोडपती'' मध्ये मंदाताई आणि प्रकाश आमटे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा "कौन बनेगा करोडपती' कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होत आहे. बच्चन यांचे सूत्रसंचलन असलेला हा कार्यक्रम देशभर प्रसिद्ध आहे. आतापर्यंत बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळचे ऍट्रक्‍शन आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई आमटे. 

हे दोघेही "केबीसी'च्या विशेष शोमध्ये लवकरच दिसणार आहेत. अर्थात सर्वानाच एक उत्सुकता असणार आहे ती म्हणजे बच्चन हे आमटे दाम्पत्यांना कोणते प्रश्‍न विचारणार ? बच्चन हे संपूर्ण देशाला पुन्हा एकदा थोर समाजसेवक बाबा आमटे, साधनाताई आमटे आणि आनंदवन आदी माहिती कशाप्रकारे सादर करतात याकडे लक्ष्य लागून राहिले आहे. 

संबंधित लेख