kavad yatra in hingoli by shivsena leader | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

शिवसेनेच्या हिंगोली जिल्हा प्रमुखांची कावड यात्रा चर्चेचा विषय

मंगेश शेवाळकर
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी काढलेली कावड यात्रा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली असून यात्रेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गावांत भेटी देऊन जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. येथील जिल्हा परिषदेवर अध्यक्षांच्या निवडीपासून ते थेट अल्पमतात असतांना विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरीया यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यासाठी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप घुगे, शिवसेना पदाधिकारी राम कदम, बालाजी सवंडकर यांनी मोलाची साथ दिली आहे. त्यानंतर श्री.

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी काढलेली कावड यात्रा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली असून यात्रेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गावांत भेटी देऊन जनसंपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. येथील जिल्हा परिषदेवर अध्यक्षांच्या निवडीपासून ते थेट अल्पमतात असतांना विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरीया यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यासाठी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप घुगे, शिवसेना पदाधिकारी राम कदम, बालाजी सवंडकर यांनी मोलाची साथ दिली आहे. त्यानंतर श्री. बांगर यांचे मातोश्रीवर चांगलेच वजन वाढले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभा मतदार संघातून श्री.बांगर यांनी तयारी सुरु केली आहे. त्यातून दररोज मतदार संघातील गावांमधे जाऊन मतदारांशी संपर्क साधला जात आहे. श्रावण महिन्या निमित्त हिंगोली तालुक्‍यातील चिंचोली महादेव ते औंढा नागनाथ येथे पायी कावड यात्रा काढली. यायात्रेमधून त्यांनी चांगलेच शक्तीप्रदर्शन केले आहे. या शिवाय हिंगणी, खेड, अंजनवाडा, कृष्णापूर, कळमनुरी आदी प्रमुख गावांना भेटी देऊन महादेवाचे दर्शनही घेतले आहे. तसेच कावड यात्रा काढलेल्या भाविकांचे स्वागत करून ठिकठिकाणी त्यांच्या साठी चहा व फराळाची व्यवस्थाही केली. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी काढलेली कावड यात्रा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. 
 

संबंधित लेख