kavad yatra in aurangabad | Sarkarnama

शिवसेनेच्या औंरगाबादमधल्या कावड यात्रेची "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड'मध्ये नोंद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यांशी संपर्क साधला असता, आम्ही कोणत्याही पुरस्कारासाठी किंवा कुठल्या विक्रमाची नोंद व्हावी म्हणून कावड यात्रा काढली नव्हती. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने स्वतःहून आमच्या धार्मिक कार्यक्रमाची दखल घेतली आणि आम्हाला सन्मानीत केले याचा मनस्वी आनंद होत आहे.

औरंगाबाद : शिवसेनेच्या वतीने श्रावण महिन्यात हर्सुलच्या हरसिध्दी देवी मंदीर ते खडकेश्‍वर महादेव मंदीरापर्यंत काढण्यात आलेल्या कावड यात्रेची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. 29 ऑगस्ट 2017 रोजी युनायटेड किंगडमच्या वल्ड बुक रेकॉर्डचे अध्यक्ष संतोष शुक्‍ला यांनी कावड यात्रेचे संयोजक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पत्र पाठवून यासंदर्भात कळवले आहे. 

पंधरा हजार शिवसैनिक व भाविकांचा सहभाग असलेल्या कावड यात्रेत पहिल्यांदा 251 फुटांची कावड तयार करण्यात आली होती. हरसिध्दी माता मंदीर ते खडकेश्‍वर या साधारणता अडीच ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत पाचशे भाविकांनी सलग ही कावड खांद्यावर उचलत नेली होती. औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच अशा कावड यात्रेचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. इंग्लंडच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने या कावड यात्रेची आपणहून दखल घेत संयोजकांशी संपर्क साधत माहिती घेतली होती. 

या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यांशी संपर्क साधला असता, आम्ही कोणत्याही पुरस्कारासाठी किंवा कुठल्या विक्रमाची नोंद व्हावी म्हणून कावड यात्रा काढली नव्हती. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने स्वतःहून आमच्या धार्मिक कार्यक्रमाची दखल घेतली आणि आम्हाला सन्मानीत केले याचा मनस्वी आनंद होत आहे. यामुळे भविष्यात आणखी चांगले काम करण्याची उर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

संबंधित लेख