kate attack unknow person | Sarkarnama

कंत्राटातून शिवसेना आमदार कातेंवर हल्ला ? : नवाब मलिक 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

मुंबई : मेट्रोचे कंत्राट मिळवण्यासाठी मुंबईत गॅंगवॉर सुरू झालंय का ? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. 

शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरील हल्ला हा कंत्राट मिळवण्यासाठी झाला की पक्षांतर्गत वादातून याची चौकशी करण्याची मागणीही मलिक यांनी केली. 
शनिवारी रात्री शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. रात्री बाराच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर भागात अज्ञातांकडून काते यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो प्रकल्पातील कारशेडचे काम सुरु आहे. दिवसरात्र सुरु असणाऱ्या या कामामुळे स्थानिक रहिवाश्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात काते यांच्या नेतृत्त्वाखाली नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा या कामाला सुरुवात झाली. तुकाराम काते यांनी काल रात्री आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन हे काम पुन्हा थांबवले. 

तेथून परतत असताना काते यांच्यावर हल्ला झाला. यावर नवाब मलिक अनेक प्रश्‍न उपस्थित केले. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून त्यांचे त्यावर नियंत्रण नाही, त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टिका मलिक यांनी केली. 
 
संबंधित लेख