kashmir newyork times | Sarkarnama

"म्हणे लष्करामुळे काश्‍मीरमध्ये हिंसाचार'

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

न्यूयॉर्क ः काश्‍मीरमधील हिंसाचार, आंदोलने, लष्कर व नागरिकांमधील वाढता संघर्ष याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर "न्यूयॉर्क टाइम्स'ने या वृत्तपत्राने घेतली असून, काश्‍मीरमधील लष्कराच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

"न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये शनिवारी (ता.22) काश्‍मीरवर अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. अत्यंत कठोर शब्दांत लिहिलेल्या या अग्रलेखातून काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, यावर भर दिला आहे. काश्‍मीरमध्ये लष्कराने फारुख अहमद दर या युवकाला त्यांच्या वाहनाला पुढे बांधून सर्वत्र फिरविले. दगडफेक करणाऱ्या जमावाविरुद्ध फारुखचा वापर लष्कराने "मानवी कवच' (ह्यूमन शील्ड) केला, असा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर काही दिवसांनी हा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. सरकारने काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांची जपणूक करण्यास प्राधान्य द्यावे, असे यात म्हटले आहे. 
या घटनेचा उल्लेख करीत भारतीय लष्कराकडून नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या इतिहासातील अत्यंत खालची पातळी जवानांनी गाठली, अशी टीका "न्यूयॉर्क टाइम्स'ने केली आहे. 

संबंधित लेख