kashmir issue, india and pakistan | Sarkarnama

मियॉं की दौड मस्जिद तक

वृत्तसंस्था
रविवार, 17 सप्टेंबर 2017

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रसंघात अनेक दहशकांपासून काश्‍मीरबाबत चर्चा होत नसतानाही पाकिस्तानने वारंवार हा मुद्दा येथे उपस्थित करणे म्हणजे "मियॉं की दौड मस्जिद तक' असल्यासारखे आहे, असा टोमणा भारताचे राष्ट्रसंघातील राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी मारला आहे.
 
राष्ट्रसंघाच्या आमसभेचे सत्र उद्यापासून (ता. 18) सुरू होत आहे. या सत्रामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी हे काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अकबरुद्दीन म्हणाले,"" भारताचा दृष्टीकोन कायमच प्रगतीशील राहिला आहे. आम्ही ठरविलेली उद्दीष्ट्ये भविष्याचा वेध घेणारी आहेत. दुसऱ्या बाजूला जर काही देश भूतकाळातील विषयांवरच अडून राहिले असतील तर ते भूतकाळातीलच माणसे समजावीत. 

संबंधित लेख