kashmir | Sarkarnama

"पीडीपी'च्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील सत्ताधारी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) पुलवामा जिल्ह्याचे अध्यक्ष अब्दुल गनी दर यांचा दहशतवाद्यांनी गोळ्या घालून खून केला. दक्षिण काश्‍मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील पिंगलेना भागात सोमवारी ही घटना घडली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

श्रीनगरपासून अवघ्या 31 किलोमीटर अंतरावर दर यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अत्याधुनिक रायफलमधून दर यांच्यावर दहशतवाद्यांनी तीन गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, तर एक गोळी दंडामध्ये लागली, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दर यांच्या खुनाची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.  

संबंधित लेख