karunanidhi passaway in tamilnadu | Sarkarnama

 माजी मुख्यमंत्री; द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचे निधन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

चेन्नई ः द्रमुकचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी (वय 95) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. तमिळनाडूतीलच नव्हे देशातील एक वजनदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. 

त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुरू होते. या उपचाराला त्यांनी साथ दिली नाही. त्यांचे आज सांयकाळी निधन झाले. करुणानिधी यांच्या अवयवांचे कार्य थंडावत असल्याचे रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी सकाळीच स्पष्ट केले होते. रक्तदाब कमी झाल्यामुळे करुणानिधी यांना 28 जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

करूनानिधी यांच्या मागे पूत्र अलिगिरी, स्टॅलिन आणि कन्या कनिमुळी तसेच नातेवंडे असा मोठा परिवार आहे. एक सर्वोत्कृष्ठ लेखक ते यशस्वी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. 

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंदयांच्यासह देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 
 
संबंधित लेख