#karunanidhi karunanidhi last ritual marina beach | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

#karunanidhi करुणानिधींवर मरिना बीचवरच अंत्यसंस्कारक होणार; मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

डीएमकेचे सर्वेसर्वा, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर चेन्नईतील मरिना बीच येथील अण्णा स्मृतिस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

पुणे : डीएमकेचे सर्वेसर्वा, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर चेन्नईतील मरिना बीच येथील अण्णा स्मृतिस्थळाशेजारी अंत्यसंस्कार करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

तमिळनाडूच्या जनमनावर राज्य करणाऱ्या कलैगनर एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून आज सकाळी आठ वाजल्यापासून मद्रास उच्च न्यायलयात सुनावणी सुरू होती. 

करुणानिधी यांचे काल सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कझघमने (डीएमके) चेन्नईतील मरिना बीच जागा निवडली. त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली. मात्र, सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे `डीएमके'ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

`करुणानिधी यांच्या पार्थिवावर त्यांच्या राजकीय गुरुच्या स्मृतिस्थळाशेजारीच अंत्यसंस्कार करू द्यावेत,' असा भावनिक युक्तिवाद डीएमकेने न्यायालयासमोर मांडला. अण्णा द्रमुकने तत्कालिन मुख्यमंत्री जे. जयललिथा यांच्या अंत्यसंस्कावेळी नियमांची पायमल्ली केल्याचा युक्तिवादही डीएमकेने न्यायालयात केला.

राज्य सरकारने युक्तिवादाला विरोध करताना `राजकीय अजेंडा'चा आरोप डीएमकेवर केला. न्यायालयाने जयललिथा यांच्या अंत्यसंस्कारासाठी देण्यात आलेल्या परवानग्यांची मागणी केली. 
 

संबंधित लेख