karti chindambaram arrested by cbi | Sarkarnama

पी.चिंदमबरम याचे पूत्र  कार्ती यांना अटक 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)े आज सकाळी चेन्नईतील विमानतळावर ताब्यात घेतले. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. 

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक मिळाल्यानंतर ते कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी कार्ती यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या मदतीने नियम वाकवल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणी सीबीआयने यापूर्वी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

गुन्हेगारी स्वरुपाची फसवणूक करणे, बेकायदा पद्धतीने लाभ घेणे, सरकार अधिकाऱ्यांवरील प्रभावाचा गैरफायदा घेणे या कलमांखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा देखील टाकला होता. बुधवारी सकाळी कार्ती चिदंबरम लंडनमधून परतताच चेन्नई विमानतळावरुन सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वीच कार्ती चिदंबरम यांच्या सीएलाही सीबीआयने अटक केली होती. 

संबंधित लेख