कर्नाटकात असंतुष्ट कॉंग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात; कमळ फुलणार का ?

नोव्हेंबरपूर्वी कॉंग्रेस व धजद पक्षाच्या असंतुष्टांना अडकविण्याचा प्रयत्न करण्याची तयारीस्थानिक भाजप नेते आतापासून करीत आहेत. केवळ लिंगायत आमदाराच नाही तर मागासवर्गीय आमदारांना वश करून घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते .
Yediyurappa_ Amit Shaha
Yediyurappa_ Amit Shaha

बंगळूर  :  भाजपने कॉंग्रेस व धजदमधील संतुष्ट आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पडद्याआडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काही कॉंग्रेस आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असून कोणत्याही क्षणी आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची त्यांनी तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते.

कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा प्रलंबित विस्तार होण्याची वाट भाजपचे नेते पाहत आहेत . मंत्रिमंडळ विस्तारात पदे कमी आणि इच्छुक फार अशी अवस्था आहे . त्यामुळे एकदा विस्तार झाला की नाराज काँग्रेस आमदारांच्या हात कमळ  देण्याची  भाजपची योजना दिसतेय . 

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात कॉंग्रेस-धजदचे युती सरकार सत्तेवर कायम राहिल्यास भाजपला 11 ते 13 जागा जिंकणे अडचणीचे होणार आहे. यासाठी राज्यातील युती सरकार खाली खेचण्यासाठी  भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व अनुकूल  असल्याचे समजते.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्माण होणाऱ्या असंतोषाचा फायदा घेऊन असंतुष्ट आमदारांना भाजपकडे ओढण्याच्या हालचाली आहेत .नोव्हेंबरपूर्वी  कॉंग्रेस व धजद पक्षाच्या असंतुष्टांना अडकविण्याचा प्रयत्न करण्याची तयारी  स्थानिक भाजप नेते आतापासून करीत आहेत . केवळ लिंगायत आमदाराच नाही तर मागासवर्गीय आमदारांना वश करून घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते . 

असंतुष्ट आमदारांच्या हालचालींवर कॉंग्रेस नेते नजर ठेवून आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करा नाहीतर पक्षाचे मोठे नुकसान होईल. काही असंतुष्ट आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा इशारा स्थानिक नेत्यांनी हायकमांडला दिला आहे.   प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे यांनीही या बाबतीत चिंत व्यक्त केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेसच्या काही आमदारांशी सपर्क साधला असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

याबाबत संपूर्ण माहिती देण्यास श्री खांडरे यांनी  नकार दिला. ते म्हणाले ,"भाजपने आमच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे, परंतु भाजपची ही योजना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही ".कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव व मंत्री डी. के. शिवकुमार यांनीही ऑपरेशन कमळ संदर्भात चिंता व्यक्त केली. भाजपने पुन्हा ऑपरेशन कमळचा प्रयत्न चालविला आहे. सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सहा मंत्री पदे भरायची आहेत . त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुक नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मंत्रिपद मिळविण्यासाठी कॉंग्रेसचे अनेक आमदार दिल्लीत गेल्या आठवड्यात दिल्लीत दाखल झाले . राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करून आपणास मंत्रिमंडळात स्थान द्यावे, नाहीतर आपला पर्यायी मार्ग असल्याचा इशारा त्यांनी दिला होता असे समजते . 

 त्याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पाही दिल्लीत होते. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार एम. बी. पाटील व येडियुरप्पा एकाच विमानातून दिल्लीला गेले होते.  मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता नसलेल्या आमदारांनी दिल्लीत येडियुरप्पांची भेट घेऊन चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  परंतु येडियुरप्पा यांनी आपण तातडीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेलो होतो, ऑपरेशन कमळसाठी नाही, असा खुलासा केला आहे.

गेल्या आठवड्यात बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार दिल्लीत ठाण मांडून बसले होते . त्याचकाळात येडियुरप्पा  देखील दिल्लीत होते .   परंतु रमेश जारकीहोळी यांनी येडियुरप्पा यांची भेट घेतल्याच्या वृत्ताचे खंडन  केले. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी आपण असल्याचे ते म्हणाले. धजदमधील काही नाराज आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. मुख्यमंत्री कुमारस्वामी मात्र तटस्थपणे या सर्व हालचालींकडे पहात आहेत.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com