Karnatak's governor is RSS Man he won't allow congress to come in power - Sanjay Raut | Sarkarnama

कर्नाटकचे राज्यपाल हे आरएसएसचे , ते कॉंग्रेसला सत्तेत येऊ देणार नाहीत -  संजय राऊत

संजय मिस्कीन : सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

कर्नाटकात भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा कॉंग्रेस आघाडीकडे आहे.

- संजय राऊत

मुंबई:  " कर्नाटकात भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा कॉंग्रेस आघाडीकडे आहे. मात्र, कर्नाटकचे राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते कॉंग्रेसला सत्तेत येऊ देणार नाहीत,''  असे  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले . 

 संजय राऊत म्हणाले," केंद्रातील सत्तेच्या बळावर भाजपने या अगोदर गोवा, मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष असतानाही त्याला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवले. आता कर्नाटकात बहुमत नसतानाही धाकदडपशाही करून भाजप सत्ता स्थापन करेल. त्याला राज्यपाल पाठबळ देतील. "

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्तेचा वापर करत आहे. यापूर्वी गोवा व मणिपूरमध्ये जे केले तेच कर्नाटकमध्ये होईल. मात्र, याचे पडसाद देशभरात उमटतील, असे स्पष्ट करत, 2019 मध्ये भाजपची केंद्रात देखील स्वबळावर सत्ता येणार नाही, असा इशारा खासदार  राऊत यांनी दिला .

संबंधित लेख