कर्नाटकात सरकारच्या पतनासाठी हालचाली वाढल्या; पहिल्या टप्प्यात 11 आमदारांचा राजीनामा? 

युती सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली असंतुष्ट आमदारांनी सुरूच ठेवल्या आहेत. बंगळुरात गुप्त बैठक घेऊन व दिल्लीत भाजप हायकमांडशी संपर्क साधून आपल्या पुढील वाटचालीवर त्यांनी निश्‍चित स्वरूपाचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पहिल्या टप्प्यात 11 जणांनी व दुसऱ्या टप्प्यात 7 आमदारांनी राजीनामा देऊन युती सरकारचे पतन करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर्नाटकात सरकारच्या पतनासाठी हालचाली वाढल्या; पहिल्या टप्प्यात 11 आमदारांचा राजीनामा? 

बंगळूर : युती सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली असंतुष्ट आमदारांनी सुरूच ठेवल्या आहेत. बंगळुरात गुप्त बैठक घेऊन व दिल्लीत भाजप हायकमांडशी संपर्क साधून आपल्या पुढील वाटचालीवर त्यांनी निश्‍चित स्वरूपाचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पहिल्या टप्प्यात 11 जणांनी व दुसऱ्या टप्प्यात 7 आमदारांनी राजीनामा देऊन युती सरकारचे पतन करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. के. सुधाकर, बळ्ळारीचे नागेंद्र याच्यासह काही आमदारांनी दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. ऑपरेशन कमळला गती देण्यात येणार असल्याचे समजते. दिल्लीत झालेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात 11 व दुसऱ्या टप्प्यात 7 आमदारांची राजीनामा देण्याची योजना निश्‍चित झाली असल्याचे समजते. एकूण 18 असंतुष्ट आमदारांत चार धजदचे आमदारही असल्याचे समजते. 

पहिल्या टप्प्यातील आमदारांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील युती सरकार अल्पमतात येईल. त्यानंतर लागलीच आणखी काही आमदारांनी राजीनामा दिल्यास युती सरकार वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरेल. अशी एकंदर व्यूहरचना आखण्यात आली असल्याचे समजते. 
या हालचालींचा युती पक्षांना सुगावा लागू नये, यासाठी भाजप नेत्यांनी दिवसरात्र धरणे आंदोलन करून युती सरकारचे लक्ष दुसरीकडे वेधण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याच दरम्यान, कॉंग्रेसच्या अतृप्त आमदारांनी दिल्लीत भाजप नेत्यांशी निर्णायक बोलणी केली असल्याचे समजते. दुसरीकडे सर्व असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधून बोलणी करण्यात आली आहेत. स्वत:ला असंतुष्ट गटाचे आमदार म्हणवून घेण्याचे धाडस दाखविण्यास सर्वच आमदार आता तयार असल्याचे समजते. 

भाजपचा हिरवा कंदील
मंगळवारी (ता.18) सकाळी बी. सी. पाटील यांच्या बंगळुरातील निवासस्थानी आमदार सुधाकर, कंप्लीचे गणेश व इतरांनी एकत्र येऊन चर्चा केली. भाजप हायकमांडने ऑपरेशन कमळला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे असंतुष्टांच्या हालचाली आता वाढल्या आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com