Karnatak Bans JaI Maharashtra slogan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

जय महाराष्ट्र म्हणण्यास यापुढे बंदी - कर्नाटक सरकारचा फतवा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मे 2017

सीमाभागातील मराठी नगरसेवक आपल्या भाषणाच्या शेवटी 'जय महाराष्ट्र' असे म्हणतात. काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होतात. त्यामुळे मराठी नगरसेवकानी भविष्यात कर्नाटक विरोधात घोषणा देवून नयेत. महाराष्ट्र राज्याचा जयघोष करू नये व त्यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होवू नये यासाठीच कायदा दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे - रोशन बेग

बेळगाव - लोकप्रतिनिधींनी 'जय महाराष्ट्र' म्हणायचे नाही, असा अजब फतवा काढण्याचे जाहीर करत कर्नाटक सरकारने बेळगावच्या मराठी नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळले आहे.कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी हा इशारा दिला आहे. 'जय महाराष्ट्र' म्हटल्यास लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होणार असल्याचे या फतव्याद्वारे जाहीर करण्यात आले आहे. बेग यांच्या या भूमिकेमुळे सीमा भागात संतापाची लाट पसरली आहे.

कर्नाटक सरकार व कन्नड विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचेसदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच संमत केला जाईल, अशी माहिती नगरविकासमंत्री रोशन बेग यानी सोमवारी प्रसारमाध्यमाना दिली. कर्नाटक विरोधात घोषणा देणाऱ्या व अन्य राज्यांचा जयजयकार करणाऱ्या नगरसेवकांना यामुळे चाप बसेल असे त्यांचे म्हणणे आहे. विधीमंडळाच्या पुढील अधिवेशनात यासंदर्भातील दुरूस्ती विधेयक मांडले जाईल. विधेयक मंजूर झाल्यानंतर महापालिका कायद्यात दुरूस्ती केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

सीमाभागातील मराठी नगरसेवक आपल्या भाषणाच्या शेवटी 'जय महाराष्ट्र' असे म्हणतात. काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होतात. त्यामुळे मराठी नगरसेवकानी भविष्यात कर्नाटक विरोधात घोषणा देवून नयेत. महाराष्ट्र राज्याचा जयघोष करू नये व त्यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होवू नये यासाठीच कायदा दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बेग यांनी सांगितले आहे. मंगळवारी बेग बेळगाव महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. त्यावेळी नगरसेवकांना याची माहिती देणार आहेत.               

संबंधित लेख