`स्वाभिमानी'ची दारे कारखानदारांसाठी बंद : तुपकर

माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. माढ्याचा उमेदवार कोण? हे खासदार राजु शेट्टी व शेतकरी ठरतील. माञ लवकरच सोलापूर जिल्ह्यातील काही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. यात एकही कारखानदार नाही, यापुढे एकाही कारखानदाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश दिला जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी आज येथे सांगितले.
`स्वाभिमानी'ची दारे कारखानदारांसाठी बंद : तुपकर

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. माढ्याचा उमेदवार कोण? हे खासदार राजु शेट्टी व शेतकरी ठरतील. माञ लवकरच सोलापूर जिल्ह्यातील काही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. यात एकही कारखानदार नाही, यापुढे एकाही कारखानदाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश दिला जाणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी आज येथे सांगितले. 

करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तुपकर बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता ज्यांनी शेतकरी संघटनेच्या जीवावर पद मिळवली आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली ते शेतकरी या नेत्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असाही टोला लगावला.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, की काही भागांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय नसल्याचे दिसत असले तरी भविष्यकाळात या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरू. हे सरकार उद्योगपतींचे आहे. सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नसून सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. अलीकडच्या काळात तर आंदोलन करणारेही यांचे समर्थक आहेत. खरे आंदोलकांना दाबण्यासाठी ही यांची राजकीय खेळी आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या सरकारच्या विरोधात एकत्र आले पाहिजे.
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com