karmala pi rajesh deore suspended | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

करमाळ्याचे पोलिस निरीक्षक राजेश देवरे तडकाफडकी निलंबित

अण्णा काळे  
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांना निलंबित करण्यात आले. बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळीच्या घटनेला जबाबदार म्हणून त्यांचे निलंब केले नाही. याशिवाय अन्य कारणांनी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 
-मिलिंद मोहीते, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर  

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. देवरे यांना निलंबित करून खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे. 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या वेळी मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व शिवाजी बंडगर यांच्यावर हल्ला झाला. यातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोघेजण अजुन फरार आहेत .त्यानंतर चारच दिवसात पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांना थेट निलंबित करण्यात आले. या घटनेमुळे निलंबित करण्यात आल्याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

तर पोलिसांनी आम्हाला सहकार्य केल्याची भुमीका बागल गटाची आहे. आजच्या मुकमोर्चाच्या वेळी अशी उघड भुमीका त्यांनी घेतली. त्यामुळे देवरे यांच्या निलंबाचे नेमके कारण काय? याविषयी चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागेवर पंढरपुर शहराचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांनी सोमवार ता.8 रोजी पदभार स्वीकारला आहे.

 

संबंधित लेख