karmala mla narayan patil criticise bagal group | Sarkarnama

8 कोटींची अदलाबदली करणारे बागल दोन्ही कारखान्यांची वाट लावतायत!

अण्णा काळे 
बुधवार, 25 जुलै 2018

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडून मकाईसाठी पैसे घेतले आहेत. यापुर्वी आदिनाथ अडचणीत असताना मकाई कारखान्याने आदिनाथला आर्थिक मदत केली होती. आता मकाई कारखान्याने ही रक्कम फक्त चार-पाच दिवसांसाठी घेतली आहे. आमचे पैसे आले की ते परत कारखान्याकडे वर्ग केले जातील. 
-दिग्विजय बागल,

अध्यक्ष, मकाई सह.साखर कारखाना 

करमाळा (सोलापूर): आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावरील 8 कोटी 80 लाख रुपये बागलांनी थेट मकाई साखर कारखान्याच्या खात्यात घेतले आहेत. असे प्रकार करुन आदिनाथ कारखाना जाणीवपूर्वक अडचणीत आणला जात आहे. ही रक्कम आदिनाथने एमएसीबीकडुन कर्ज म्हणून घेतलेली आहे. या कर्जाचे व्याज आदिनाथ भरणार आणि पैसे मात्र मकाई वापरणार आहे. बागलांनी दोन्ही कारखाने अडचणीत आणण्याचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेना आमदार नारायण पाटील केला आहे. 

ते करमाळा येथिल पत्रपरिषदेत बोलत होते. पुढे बोलताना आमदार नारायण पाटील म्हणाले, आदिनाथ साखर कारखाना उभा राहावा म्हणून माझे वडील गोविंदबापू पाटील यांनी मोठे परिश्रम घेतले. आता हा कारखाना बागल कुटुंबाकडे आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चांगला चालावा म्हणून संचालक बोर्डाने कर्ज घेतले. परंतु बागल यांनी या कारखान्याची रक्कम श्री मकाई कारखान्याला घेतली आहे. मकाई कारखाना स्थापनेपासुन बागल गटाच्या ताब्यात असुनही हा कारखाना मोठ्या अर्थिक अडचणीत आहे. बागलांनी दोन्ही कारखाने अडचणीत आणले आहेत. तालुक्‍यातील आदिनाथ व मकाई ही दोन साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे आहेत. मात्र बागल यांनी दोन्ही कारखान्याचा वैयक्तीक स्वार्थासाठी वापर करून कारखाने डबघाईला आणले आहेत. 

आदिनाथ सह साखर कारखान्याचे 8 कोटी 80 लाख रूपये उसने म्हणुन मकाईला दिले आहेत.मकाईला एमएसीसी बॅंकेचे कर्ज मिळाले की ही रक्कम परत मिळणार आहे. 
 -संतोष जाधव-पाटील,अध्यक्ष आदिनाथ सह साखर कारखाना 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख