karmala avinash hadgal | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

वादग्रस्त "अविनाश हदगल' करमाळ्याचे निवडणूक निरीक्षक ! 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीची पहाणी निवडणूक निरीक्षक अविनाश हदगल यांनी केली. सद्या कोल्हापूरला उपजिल्हाधिकारी असलेले हदगल 2014 ला करमाळा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांनी दिलेला निकाल खूप गाजला अन न्यायायालयातही गेला. या वादानंतर हदगल हे पहिल्यांदाच करमाळ्यात आले. 

विधानसभेच्या मतमोजणीवेळी पोस्टल मतांचा प्रश्न चांगलाच गाजला. मतपत्रिकेबरोबरच्या अर्जावर गॅझिटेड ऑफिसरच्या सह्या नसल्याने 777 मते बाद समजण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेचे नारायण पाटील यांना 257 मतांनी विजयी घोषीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवार रश्‍मी बागल यांनी बाद समजलेली मते मोजण्याची मागणी केली होती. मात्र श्री. हदगल हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर अविनाश हदगल हे बरेच दिवस रजेवर होते. त्यांच्या निर्णयाची बरीच चर्चा झाली. पुढे ते थेट कोल्हापूर येथे भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. 

विधानसभेचा निकाल 19 ऑक्‍टोबर 2014 ला लागला होता. त्यानंतर आता तब्बल तीन वर्षानी श्री. हदगल हे करमाळा येथे ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक म्हणून नुकतेच दौऱ्यावर आले होते. करमाळा तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतीसाठी नेमणूक केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. ईव्हीएम मशीनची पाहणी केली. संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या पारेवाडी, वाशिंबे, जिंती, पोफळज आदी मतदान केंद्राची माहिती घेऊन सुरक्षा व्यवस्थेविषयी सूचना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी स्नेहा उबाळे, तहसीलदार संजय पवार उपस्थित होते. 

संबंधित लेख