Karjat, Malakapur & Shrigonda municipality election on 27 Jan | Sarkarnama

कर्जत , मलकापूर आणि श्रीगोंदा नगर परिषदेसाठी २७ जानेवारीला मतदान 

सरकारनामा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

.

मुंबई  :  रायगड   जिल्ह्यातील  कर्जत ,  मलकापूर (जिल्हा  सातारा), श्रीगोंदा ( जिल्हा   अहमदनगर), आरमोरी (जिल्हा    गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला ( जिल्हा    नागपूर) या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २७ जानेवारीला मतदान होणार आहे . 

 विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी म्हणजे  27 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की," 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30या वेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल."

पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी : राजापूर (जि.रत्नागिरी)- 6अ, आळंदी(पुणे)- 9अ, फलटण (सातारा)-12अ, दुधनी (सोलापूर)- 2ब, पन्हाळा (कोल्हापूर)- 8क, दिंडोरी (नाशिक)-15, यावल(जळगाव)- 1अ, बीड- 11अ, बुलढाणा- 12ब, अर्जुनी (गोंदिया)-14, गोरेगाव (गोंदिया)- 14.

संबंधित लेख