karhad-bacchu-kadu-prakash-ambedkar-mim-bjp | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर व एमआयएम एकत्र येणे म्हणजे भाजपला पाठिंबा दिल्यासारखेच : आमदार बच्चू कडू 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 सप्टेंबर 2018

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनी एकत्र येऊन वेगळी चुल उभी करणे म्हणजे कॉंग्रेस कमी करुन भाजपला पाठिंबा दिल्यासारखेच आहे, असे आरोप आमदार बच्चू कडू  यांनी आज येथे केला. 

कऱ्हाड : प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनी एकत्र येऊन वेगळी चुल उभी करणे म्हणजे कॉंग्रेस कमी करुन भाजपला पाठिंबा दिल्यासारखेच आहे, असे आरोप आमदार बच्चू कडू  यांनी आज येथे केला. 

सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान आमदार कडू यांनी आज कऱ्हाड (जि.सातारा) येथे भेट दिल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, की कॉंग्रेस कमी कशी होईल याचा बंदोबस्त भाजप करणार आहे. भाजपकडे जेवढा पैसे आहे तेवढा अमेरिकेकडेही नाही. कॉंग्रेसला जे पन्नास वर्षात जमले नाही ते पाच वर्षात भाजपने नोटाबंदीत कमवुन दाखवले आहे. प्रचंड पैसा भाजपकडे असल्याने सर्व पार्ट्या कशा मॅनेज करायच्या याची व्यवस्था सुरु आहे.

भाजपचे न लढता जिंकणे असे धोरण आहे. त्यातुन भाजप हात मारुन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेसने पन्नास वर्षात जे पाप केले ते पाप पाच वर्षात लगेच लोकांना विसरता येईल, असे वाटत नाही. कॉंग्रेसकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन अजुनही चांगला दिसत नाही. अजुनही मजबुतीने, मुद्दे घेवुन कॉंग्रेस लोकांसमोर येताना दिसत नाही. मोठे आंदोलनही त्यांनी केलेले नाही. त्यांच्या भुमिकेत स्पष्टता नाही. आम्ही जनतेसोबत असुन जनतेसोबत स्वतंत्र राहु, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले
 

संबंधित लेख