karhad-bacchu-kadu-criticises-power-minister | Sarkarnama

... तर ऊर्जामंत्र्यांचा उलटा पुतळा मंत्रालयासमोर टांगणार : आमदार कडू

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 सप्टेंबर 2018

कऱ्हाड : वीज डीपी जळाली आणि ती दुरुस्त करायची असेल तर शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी, असे जाचक आदेश काढले आहेत. शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत असताना त्यांच्या पडतीच्या काळात सरकारने असे धोरण घेतले आहे. या १५ दिवसात हे आदेश मागे घ्यावेत अन्यथा ऊर्जामंत्र्यांचा उलटा पुतळा मंत्र्यालयासमोर टांगून आंदोलन करु, असा इशारा आमदार कडू यांनी आज दिला. 

कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,  अफजलखानाने काढला नाही एवढा जाचक आदेश वीज कंपनीने काढला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी जळेल त्याची भरपाईची ठरावीक रक्कम शेतकऱ्यांनी भरावी, असे आदेश काढले आहेत. सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहे. निम्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. अशातच शेतकऱ्यांना वीजच मिळत नाही. मिळाली तर बील आकारणी विचीत्र पध्दतीने केली जाते. त्यामुळे वीज कंपनीविरोधात शेतकऱ्यांत मोठा रोष आहे. सरकाने अकबरी भरपापाईचा हा निर्णय घेतला आहे. तो १५ दिवसात माने न घेतल्यास उर्जामंत्र्यांचा पुतळा मंत्रालयासमोर टांगुन आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख