karhad-bacchu-kadu | Sarkarnama

फाईव्हस्टार हॉटेलला मुबलक पाणी देता आणि शेतकऱ्यांवर बंधने का ?; आमदार बच्चू कडूंचा सवाल  

हेमंत पवार 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

विहीरीतील पाण्यावर कर लाऊन नवीन विहीर काढण्यासाठी सरकार कायदा करणार आहे. फाईव्ह स्टार हॉटेलला लागेल तेवढे पाणी देता आणि शेतकऱ्यांना विहीर काढण्यासाठी, त्यातील पाणी वापरण्यासाठी कर लावता ? हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा झाला आहे. त्यामुळे हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असून आम्ही येत्या अधिवेशनात हा कायदा हाणून पाडू, असे आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी दिले. 

कऱ्हाड : विहीरीतील पाण्यावर कर लाऊन नवीन विहीर काढण्यासाठी सरकार कायदा करणार आहे. फाईव्ह स्टार हॉटेलला लागेल तेवढे पाणी देता आणि शेतकऱ्यांना विहीर काढण्यासाठी, त्यातील पाणी वापरण्यासाठी कर लावता ? हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा झाला आहे. त्यामुळे हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असून आम्ही येत्या अधिवेशनात हा कायदा हाणून पाडू, असे आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी दिले. 

कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर आल्यावर आमदार कडू बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, नितीन बानगुडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 
आमदार कडू म्हणाले, शेतकऱ्यांना ठिबकसाठी १०० टक्के अनुदान द्या. पाणी वाचवायच्या उपाययोजना सरकार करत नाही आणि शेतकऱ्यांवर पाण्यासाठी कायद्याचे बंधन घातले जात आहे. ते आम्ही सहन करणार नाही.त्याविरोधात येणाऱ्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरुन ते विधोयक मागे घ्यायला लावू.
 

संबंधित लेख