kardile and jagtap nagar corporation | Sarkarnama

आमदार जगताप यांना नगर महापालिका निवडणुकीत विखे कर्डिलेची रसद

मुरलीधर कराळे
मंगळवार, 31 जुलै 2018

नगर : बाजार समितीच्या संचालकांच्या सत्काराच्या निमित्ताने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व कॉग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण एकमेकांसोबत घट्ट आहोत, हे जाहीरपणे सांगितल्याने राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.या युतीचा परिणाम चार महिन्यांवर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर होणार, हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार कर्डिले यांची ताकद महापालिकेत वापरली जाणार असून, त्याचा फायदा कर्डिले यांचे जावई राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मिळणार, हे उघड आहे.

नगर : बाजार समितीच्या संचालकांच्या सत्काराच्या निमित्ताने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व कॉग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपण एकमेकांसोबत घट्ट आहोत, हे जाहीरपणे सांगितल्याने राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.या युतीचा परिणाम चार महिन्यांवर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर होणार, हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार कर्डिले यांची ताकद महापालिकेत वापरली जाणार असून, त्याचा फायदा कर्डिले यांचे जावई राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मिळणार, हे उघड आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दृष्टीने विखे व कर्डिले हे अडचणीचे मुद्दे ठरतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 
कर्डिले यांची ढवळाढवळ सुरूच 
नगर महापालिकाचा संबंध राहुरी व श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाशी अगदी जवळचा आहे. कारण दोन्ही मतदारसंघातील अनेक गावे नगर तालुक्‍यातील आहे. नगर तालुक्‍यावर आमदार कर्डिले यांचे वर्चस्व गेल्या पंचवीस वर्षांपासून आहे. त्यामुळे कर्डिले यांची भूमिका दोन्ही मतदारसंघाबरोबरच महापालिकेवरही निर्णयाक ठरते. त्यामुळे कर्डिले यांची महापालिकेच्या राजकारणात कायम ढवळढवळ असते. शिवाय कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नगर शहरावर म्हणजेच महापालिका आपल्या हाती असणे आवश्‍यक आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे असली, तरी आमदार जगताप यांनी आंदोलने करून शिवसेनेला त्रस्त केले होते, हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही जावईप्रेमापोटी कर्डिले यांची महापालिकेत ढवळाढवळ सुरूच राहणार आहे, हे निश्‍चित आहे. 
राष्ट्रवादीला विखेंचीही ताकद मिळणार 
नगर महापालिकेत राष्ट्रवादी-कॉग्रेसला सत्ता मिळण्यासाठी डॉ. सुजय विखेही तितकीच ताकद लावणार आहेत. कारण आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला डॉ. विखे उमेदवार असणार आहेत. त्यांनाही नगर शहरावर वर्चस्व हवे आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नगर शहर हे मोठे मतदाराचे पॉकेट आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे विखे यांना अशक्‍य आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी- कॉंग्रेसच्या आघाडीला हवी ती मदत करणार आहेत. दुसरीकडे आमदार जगताप यांना आगामी विधानसभेसाठी शहरावर वर्चस्व हवे असल्याने नगरसेवक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आमदार जगतापही महापालिकेसाठी जीवाची बाजी लावतील. साहजिकच सासरे शिवाजी कर्डिले त्यांना हवी ती मदत करणार आहेत. एकूनच राष्ट्रवादीला डॉ. विखे यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार कर्डिले हे एकत्रित बळ मिळणार असल्याने शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी आमदार जगताप यांना डबल ताकद मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख