#KaranRajkaran Citizens facing Water Problems in Wakad | Sarkarnama

#कारणराजकारण : वाकड भागात पाण्याच्या समस्येने नागरीक हैराण

टीम ई-सकाळ
सोमवार, 15 एप्रिल 2019

पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या हद्दीतील वाकड भागात पाण्याची मोठी समस्या असून टँकरने पाणी आणावे लागत असल्याचे वाकड परिसरातील नागरिकांनी सांगितले. सोबतच वाढत्या औद्योगीकरण मुळे होत असलेली वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर त्रासदायक ठरत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

वाकड (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या हद्दीतील वाकड भागात पाण्याची मोठी समस्या असून टँकरने पाणी आणावे लागत असल्याचे वाकड परिसरातील नागरिकांनी सांगितले. सोबतच वाढत्या औद्योगीकरण मुळे होत असलेली वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर त्रासदायक ठरत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

सकाळच्या कारण राजकारण मालिके अंतर्गत वाकड परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्यात आला त्यावेळी त्यांच्याकडून अनेक स्थानिक अडचणी मांडण्यात आल्या. मेट्रोचा प्रश्न आणि तिच्या रचनेत चुका असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. सोबतच वाढती बेरोजगारी आणि बी आर टी मुळे होत असलेला त्रासही नागरिकांनी सांगितला.

मुळा इंद्रायणी नदीत होणारे प्रदुषण वाढत आहे, त्यावर लक्ष द्यायला हवे ल. धरणातील गाळ काढण्याचे काम करायला हवे. मागे आपण पवना धरणातील गाळ काढला असल्याच्या बातम्या वाचल्या असतील त्याचे स्वागत पण तरीही पाणीप्रश्न आहेच. मग यावर काही ठोस उपाय योजना का होत नाही हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सकाळने सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणली. कारण राजकारण या मालिकेतील हा शेवटचा भाग होता, यामध्ये वाकडच्या नागरिकांनी भाग घेतला.

 

संबंधित लेख