कारणराजकारण : आता आश्वासने बस्स...आधी दिली ती पूर्ण करा!

'मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळालं तेवढंच...त्यांच्या नंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो..फेऱ्या मारून थकलो ...माझी बायको आता चुलीवरच जेवन बनवते...' वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी परिसरातील हा रहिवासी. सकाळच्या #कारणराजकारण मालिके दरम्यान आम्ही वडगावशेरी मतदार संघातील काही भागातील नागरिकांशी संवाद साधला. या लोकांशी बोलून जाणवत होतें सरकारने योजना आणल्या पण त्या गरजुंपर्यंत पोहचल्याच नाहीत. त्यांचे रोजची प्रश्न अजूनही तसेच आहेत.
कारणराजकारण : आता आश्वासने बस्स...आधी दिली ती पूर्ण करा!

'मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळालं तेवढंच...त्यांच्या नंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो..फेऱ्या मारून थकलो ...माझी बायको आता चुलीवरच जेवन बनवते...' वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी परिसरातील हा रहिवासी. सकाळच्या #कारणराजकारण मालिके दरम्यान आम्ही वडगावशेरी मतदार संघातील काही भागातील नागरिकांशी संवाद साधला. या लोकांशी बोलून जाणवत होतें सरकारने योजना आणल्या पण त्या गरजुंपर्यंत पोहचल्याच नाहीत. त्यांचे रोजची प्रश्न अजूनही तसेच आहेत. 

गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने गरीबांसाठी कित्येक योजना आणल्या...आज त्याचा गवगवा केला जात आहे..पण सत्य परिस्थिती मात्र वेगळीच आहे...योजनांचे लाभार्थी फक्त कागदावरच आहेत...प्रत्यक्षात मात्र गरजु अजूनही सुविधांपासून वंचितच आहे.

गेल्या 10 वर्षात पुण्याच्या आजुबाजूची उपनगरे झपाट्याने विस्तारली. वडगावशेरी मतदार संघ... देखील असेच उपनगर.  विमाननगर, येरवडा, लोहगाव, वडगावशेरी, खराडी ,वाघोली हे भाग कॉस्मोपलिटन म्हणून ओळख निर्माण करत आहे. पण प्रत्यक्षात गावकी भावकी जपणाऱ्या संस्कृती तील पुढाऱ्यांमुळे या भागाचा विकास अपेक्षित विकास झाला नाही. गेल्या काही वर्षात या भागात कित्येक कंपन्या आल्या... उद्योग आले. येथील रहिवाशांना काही प्रमाणात रोजगाही मिळाले..पण सुविधा मात्र अजूनही अपुऱ्या आहेत. 

येथे एकीकडे मोठ्या मोठ्या कंपन्या..सोसायटी... उच्चभ्रू परिसर तर एकीकडे झोपडपट्टी अशी स्थिती आज याभागाची झाली आहे. येथील पाणी, गटार, स्वच्छता, कचरा, रस्ते या प्रश्नांवर अजूनही ठोस उपाय झालेले नाहीत. विमाननगर भागातील नागरिकांना सध्या राजकारण्यांची सुरू असलेली चिखलफेक नको वाटतेय. "2014 पूर्वी भाजपने 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले त्याचे काय झाले? आणि आता काँग्रेस दारिद्र्य रेषेखालील लोकांना वार्षिक 72000 रुपये देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र त्यासाठी पैसे कोठून आणणार?" असा सवाल येथील मतदारांनी विचारला. मतदारांना केवळ चकचकीत आश्वासने नकोत, तर दिलेली आश्वासन पूर्ण करणारे सरकार हवे आहे. वडगाव शेरी भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. तो प्रश्न सुटावा एवढीच माफक अपेक्षा या मतदासंघातील नागरिकांची आहे. पण तो कधी सुटेल याचे उत्तर मात्र मिळत नाही.

आयटी कंपन्या मुळे काही भागाच विकास झाला तर काही भागात मात्र मूलभूत सुविधांचा देखील अभाव दिसत आहे. अपुरा पाणी पुरवठा, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, धोकादायक विद्युत तारांचे जाळे, कचरा अश्या सर्वच सुविधांचा अभाव खराडी तील थिटे वस्तीत दिसला. येथे स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यावर कोणीच दखल घेत नाहीये. 
जलपर्णीमुळे परिसरात वाढलेले डासांचे प्रमाण रोगराईला आयतेच आमंत्रण देत आहे. माणसे कमी आणि डास जास्त अशी परिस्थितीत असूनही उपाययोजना मात्र शून्य. "या भागातील विजयी उमेदवार गेल्या 5 वर्षात इकडे फिरकले सुध्दा नाही."अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली.

एकूण काय तर सत्ताधारी मते मिळेपर्यंत खोटी आश्वासन देऊन मतदारांनी दिशाभुल करताहेत. नंतर आश्वासनाची पूर्तता सोडा पण साध्या सुविधा देखील पुरवत नाहीत. काही मतदारांना तर उमेदवाराची नाव देखील माहीत नाही तर काही भागात मतदारांचा कल हा व्यक्तीपेक्षा, त्याच्या कामापेक्षा पक्षाला मानणारा आहे. हे चित्र पाहता येत्या निडणुकीमध्ये युती, आघाडी आणि इतर पक्षांमध्ये चुरशीची लढत होईल हे नक्की. पुन्हा एकदा मतदार मनात कित्येक अपेक्षा घेवून उमेदवारांना मत देतील. पण त्यानंतर हे चित्र बदलेल की नाही हे याची शास्वती मात्र कोणालाच नाही, असे स्पष्ट दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com