Karanataka police investigation created pressure on Maharashtra police | Sarkarnama

'कर्नाटक'च्या तपासामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी दाभोलकरांच्या खुन्यांना पकडले :  कन्हैय्याकुमार 

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

डॉ. दाभोलकरांची हत्या पाच वर्षांपूर्वी झाली. चार वर्षे महाराष्ट्रातील यंत्रणा गप्प होत्या. तपासात काहीच गती नव्हती. मात्र कर्नाटकातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा छडा लावला. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारने घाईघाईने कारवाई करीत दाभोलकर हत्येतील आरोपींना अटक केली.

 

नाशिक :  "डॉ. दाभोलकरांची हत्या पाच वर्षांपूर्वी झाली. चार वर्षे महाराष्ट्रातील यंत्रणा गप्प होत्या. तपासात काहीच गती नव्हती. मात्र कर्नाटकातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा छडा लावला. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारने घाईघाईने कारवाई करीत दाभोलकर हत्येतील आरोपींना अटक केली. ज्या प्रवृत्तींनी हत्या घडवली त्यांच्या  सत्तेच्या संरक्षणात हे हल्ले करीत आहेत ,"असा आरोप जे. एन. यु. विद्यार्थी संघटनेचे बहुचर्चीत माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांनी केली. 

विविध डाव्या संघटनांतर्फे आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेंतर्गत 'निर्भय बनो, सवाल पुछो!' कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, " न्यायालय, संसद, प्रशासन आणि पत्रकारीता हे लोकशाहीतील चार स्तंभ आहेत. यातील न्यायालयात काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे. पत्रकारिता दबावाखाली आहे. नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन टिका करु नका असे पत्रकारांना बजावले जात आहे. कोणी टिका केली तर त्यांना घरी जावे लागते. हे अतीशय दुर्दैवी असुन दोन्ही स्तंभ कमकुवत केले जात आहेत. विरोधी पक्ष कमकुवत करण्यात ते आधीच यशस्वी झालेत. प्रशासन दडपणाखाली आहे. त्यामुळे हे लोकशाहीवरील मोठे संकट आहे. वेळीच सर्व विरोधी पक्ष एकत्र आले नाही तर भविष्यात काहीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सावधतेने पावले टाकण्याची ही वेळ आहे. " 

नरेंद्र मोदी नव्हे 'वोल्डेमॉर्ट' ! 
ते पुढे म्हणाले, " आज कोणी विवेकशील, विज्ञानवादी बोलत असेल. समाजाला चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा आवाज बंद केला जातो. हत्या होते. मारहाण  केली जाते. खोटे खटले दाखल करुन तुरुंगात डांबले जाते. एखाद्याच्या मताशी सहमत असहमत असु शकता. मात्र थेट त्याचा आवाजच दाबण्याचे काम सध्या सरकारच्या संरक्षणात सुरु आहे. देशातील सर्व यंत्रणा कार्यक्षम आहेत. मात्र त्यांना स्वतंत्रपणे काम करु दिले जात नाही. हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे प्राण्यांची काळजी घ्या मात्र जिवंत माणसांची नाही हा संदेश आहे. कोणीच पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन टिका करु शकत नाही. सगळीकडे "थ्रेट' अन्‌ भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे."

संबंधित लेख