karamala bajar samiti result | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

जगताप गटाच्या 29 वर्षांच्या सत्तेला बागल गटाने लावला सुरुंग 

​अण्णा काळे 
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

बागल गटाला सत्ता स्थापनेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटावर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीत 29 वर्षांपासुन सत्ताधारी असलेल्या जगताप गटाला जोरदार धक्का देत बागल गटाने जोरदार मुसंडी मारत 8 जागेवर विजय मिळवला आहे .मात्र सत्ता स्थापनेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटावर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. 

आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप हे या निवडणुकीत एकत्र आले होते. बागल गटाने स्वतंत्र निवडणुक लढवली तर शिंदे गट व भाजप एकत्र आले होते.या निकालाने त्रिशंकु स्थिती निर्माण केली आहे. 8 जागा बागल गटाला मिळाल्या असल्या तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 

पाटील- जगताप गटाला 6 जागा तर पहील्यांदाच बाजर समीतीच्या निवडणुकीत उतरलेल्या शिंदे गटाने 1 जागा मिळवुन खाते खोलले आहे. 

एकुण 18 जांगासाठी बाजार समीतीची निवडणुक लागली होती. यामध्ये 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. व्यापारी मतदारसंघातील दोन जागेवर जगताप गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर शिंदे गटाला मानणाऱ्या सावंत गटाकडे हमाल/ तोलारची मतदारसंघाची एक जागा आहे. 
 

संबंधित लेख