उंडाळकरांचे तिकीट पक्षश्रेष्ठींनीच कापले होते : पृथ्वीराज चव्हाण 

पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील उंडाळकर यांच्यातील संघर्ष सातारा जिल्ह्याला माहिती आहे. 2014 च्या निवडणुकीत पृथ्वीराज यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस निवडणुकीला सामोरी गेली. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात, 30 वर्षाहून अधिक काळ प्रतिनिधीत्व केलेल्या उंडाळकरांचे तिकीट कॉंग्रेसकडून कापण्यात आले. तिथे पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. पुर्वीचा संघर्ष आणि प्रत्यक्षात तिकीट कापल्याने उंडाळकरांनी संतप्त होत बंडखोरी केली होती. या निवडणुकीत पृथ्वीराज विजयी झाले, मात्र उंडाळकर कॉंग्रेसपासून दुरावले. त्यानंतर याविषयीवर पृथ्वीराज पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले आहेत.
उंडाळकरांचे तिकीट पक्षश्रेष्ठींनीच कापले होते : पृथ्वीराज चव्हाण 

कऱ्हाड (सातारा) : काका-बाबा गटात संघर्ष असायचे काही कारण नाही. काय-काय घडलं, ते तुम्हाला माहिती आहे. मला कॉंग्रेस पक्षाने तिकीट देण्याचा निर्णय घेतला. तो माझा निर्णय नव्हता, पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. तो निर्णय मान्य व्हायला पाहिजे होता, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काका-बाबा गटाच्या संघर्षावर व्यक्त केले. 

कॉंग्रेसच्या वर्चस्वासाठी जिल्ह्यातील संघर्ष मिटवुन काका-बाबा गट एकत्र यायला पाहिजे, या प्रश्नावर श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील संघर्षापेक्षा पहिल्यांदा कऱ्हाडमध्ये संघर्ष मिटवला पाहिजे. दोन्ही गटात संघर्ष असायचे काही कारण नाही. काय-काय घडलं आहे ते तुम्हाला माहिती आहे. मला कॉंग्रेस पक्षाने तिकीट देण्याचा निर्णय घेतला, तो माझा निर्णय नव्हता. पक्षश्रेष्ठींनी घेतला होता. तो निर्णय मान्य व्हायला पाहिजे होता, असे सांगून श्री. चव्हाण यांनी अधिक बोलणे टाळले. जातीयवादी संघटनांना पराभूत करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. मात्र ते झाले नाही तर पुन्हा जातीयवादी पक्षच सत्तेवर येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com