CO औधकरांच्या बदलीनिमित्ताने पृथ्वीराजबाबांची कोंडी! 

माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा गटही शहरात सक्रीय आहे. तो सध्या सगळ्याच घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. ते सावधगिरीने भुमिका घेताना दिसत आहेत युवा नेते उदयसिंह पाटील शहरातील अनेक ठिकाणी उपस्थीती लावत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडामोडींवर त्या गटाने वेट ऍन्ड वॉचीच भुमिका आहे.
CO औधकरांच्या बदलीनिमित्ताने पृथ्वीराजबाबांची कोंडी! 
CO औधकरांच्या बदलीनिमित्ताने पृथ्वीराजबाबांची कोंडी! 

कऱ्हाड (सातारा) : येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदलीच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांची बदली व्हावी व होवू नये, अशा दोन्हीसाठी राजकीय गट सक्रीय आहेत. बदलीनिमित्ताने कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय कोंडी करण्याची खेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

औंधकर यांच्या बदलीसाठी प्रथम पालिकेचे पदाधिकारी, त्यानंतर कामगार सक्रीय झाले. दोन महिन्यापासून हा खेळ सुरु आहे. मात्र शासन ठोस निर्णय झालेला नाही. शासन श्री. औंधकर यांची बदलीही करेना किंवा त्यांना कामावर हजर राहण्याचेही आदेशही देईना. मंत्रालय पातळीवर दबावाची पालिकेच्या वर्तुळात चर्चा आहे. शहरासह ग्रामीण भागातही त्याची चर्चा रंगली आहे. शासन काहीही निर्णय घेईल, तो भाग वेगळा. मात्र श्री. औंधकर यांच्या बदलीच्या मागे मोठी राजकीय उलथापालथ होत आहेत. 

बदली व्हावी, यासाठी भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र यादव, त्यांचे गटनेते हणमंत पवार यांनी त्यांच्या मागे तगादा लावला आहे. श्री. भोसले यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली आहे. अद्यापही त्यावर निर्णय नाही. 

वास्तविक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात जाधव, यादव व पाटील गट एकत्र येवून यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडी स्थापन झाली. मात्र आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी राजेंद्र यादव यांचा निवडणुकीत पराभव झाला. तो आघाडीच्या जिव्हारी लागला. त्याचे खापर पृथ्वीराज चव्हाण गटावर फोडून निवडूण आलेल्या पंधरापैकी अकराजण चव्हाण गटापासून बाजूला झाले. एखाद दुसरा नगरसेवक त्या गटाकडे आहे. निवडणुकीत भाजप व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांची आघाडी आमदार चव्हाण गटाच्या विरोधात होती. त्यात भाजपला नगराध्यपदासह सहा जागा मिळाल्या. सत्ताधारी अल्पमतात व विरोधक बहुमतात आले. राजेंद्र यादव यांच्या पराभवापासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडींना गती मिळाली ती श्री. औंधकर यांच्या बदलीच्या मागणीपासून. 

पालिकेच्या नऊ नगरसेवकांवर रस्ता दुभाजकप्रश्नी तक्रारीची ढाल करून भाजपने राजकीय गणित मांडले आहे. त्या दुभाजक प्रकरणात नऊ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्याचा फायदा घेत खेळी आखली गेली आहे. त्यात भाजपचे अतुल भोसले, सहकार परिषदचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर यांची नावे पुढे आहेत. अतुल भोसले व जयवंत पाटील यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. त्यामुळे ते त्यांना त्या फेऱ्यात येवू देणार नाहीत, हे सत्य असले तरी त्यांच्या माध्यमातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय खेळी केल्या आहेत. त्यात पृथ्वीराज चव्हाण गटाला खिळखिळीत करण्यासाठीचे प्रयत्न मोठे आहेत. भाजपही त्यांना रसद पुरवत आहे. 

रस्ता दुभाजकचा प्रश्न शासन निकालावर आहे. मात्र तो अडीच महिन्यापासून लांबवलेला आहे. तो लांबवलेला निकाल, मुख्याधिकारी औंधकर यांच्याबाबतीत ठोस निर्णय न झाल्याने लांबलेले प्रकरण, कर्मचाऱ्यांनाही निर्णयाचा अंदाज न लागू देणे, जिल्हाधिकारी यांच्यावरही दबावाचा प्रयत्न करणे, या सगळ्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अनेक विद्यमान नेते अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांच्या संपर्कात आहेत. मुख्याधिकारी औंधकर यांची बदली होवू नये, यासाठी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह त्यांच्या गटाने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शासनालाही श्री. औंधकर यांच्याबाबत ठोस निर्णय घेताना कोंडी होत असल्याचे दिसत आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com