kapil patil and bjp | Sarkarnama

...हल्ली इतिहास रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत लिहिला जातो - कपिल पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 डिसेंबर 2018

गोंदिया : भारताचा खऱ्या इतिहासातील पाने फाडून बनावट इतिहास लिहिण्याचे काम सध्या रा. स्व. संघ परिवारातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होत असल्याचा आरोप लोकभारती पक्षाचे नेते व आमदार कपिल पाटील यांनी आज गोंदियात केला. गोंदियात आज शिक्षक साहित्य संमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. यावेळी कपिल पाटील यांनी इतिहासाच्या होत असलेल्या विकृतीकरणावर जोरदार टीकास्त्र सोडले. 

जो इतिहास घडला, तसाच आपण स्वीकारला पाहिजे, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, ज्यांनी इतिहासात कोणतेही योगदान दिले नाही, ते लोक आता इतिहास आपल्या पद्धतीने रंगवू पाहत आहे. यासाठी परिवारातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेचा समावेश आहे. या संस्थेत इतिहासाला विकृत रुप देण्याचे काम होत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. 

पाठ्यपुस्तकातून चुकीचा इतिहास मुलांना शिकविण्याचे भविष्यातील पिढ्याचे अतोनात नुकसान होणार आहे. या सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) स्वतंत्र अस्तित्वच संपवून टाकले आहे. इतिहास परिषदेवर संघाच्या पठडीतील व्यक्तींचा समावेश केला आहे. ज्यांना इतिहासाची कवडीची माहिती नाहीत, ते लोक आता इतिहास लिहू लागले आहेत, हा अत्यंत घातक पायंडा असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. देशाचे संविधान हा ग्रंथच सर्वोत्कृष्ट असून या ग्रंथाच्या आधारे देश चालला पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले. 

संबंधित लेख