शेवटी ते भाऊच 

शेवटी ते भाऊच 

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोहोतून सध्या विस्तव जात नाही की काय असे आजकाल वाटतेय ना ? मुखपत्रातून भाजपवर होणारी टीका बघता युती टिकायची नाही याची खात्री झालीये ना ? पण निष्कर्षाला पोहोचण्यापूर्वी काही दिवस वाट पहा. राज्यसभेचे सदस्य पत्रकार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्‍त केली असली तरी किमान पाच वेळा तरी शेवटी आम्ही भाऊ आहोत असे उल्लेख आहेत. 

भाजपचे सर्वात वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयींची प्राणज्योत हरपली तेव्हा ठाकरे लगेच दिल्लीकडे रवाना झाले. शिवसेनेच्या संसारात त्यांना मम म्हणत चोवीस तास मदत करणाऱ्या रश्‍मीवहिनीही निघाल्या. आदित्य युवा सेनेचे प्रमुख. ते मागे कसे रहाणार ? हे तिघे दिल्लीकडे निघताच मनस्वी स्वभावाच्या तेजसनेही मला अंत्यदर्शनाला जायचे आहे असे ठरवले. खुद्द बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेत विलक्षण वेगळे व्यक्‍तीमत्व म्हणून गौरवलेला तेजस दिल्लीला निघाला ही बाब भाजपनेत्यांनाही सदगदित करणारी होती. 

रात्री उशीरापर्यंत वाजपेयींच्या निवासस्थानी थांबलेले ठाकरे कुटुंबिय दुसऱ्या दिवशीही पक्ष मुख्यालयात गेले. उद्धव ठाकरे तर वाजपेयींचे अभिन्न सहकारी असलेल्या पुराणपुरूष लालकृष्ण अडवाणींशेजारी बसले,त्यांच्या शोकविव्हल भावनांशी जणू ते तादात्म्य झाले.

वाजपेयी यांची मानसकन्या नमिता भटटाचार्य तसेच कुटुंबीय भाजप कार्यालयात अध्यक्ष अमित शहा यांच्या कक्षात बसले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबिय त्या परिवाराला भेटतील ,संवेदना व्यक्‍त करू शकतील याची जातीने सोय बघितली.

संजय राऊत क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या अंत्यसंस्कारामुळे असेल किंवा भाजप कार्यकर्त्यांच्या रोषापासून बचावण्यासाठी असेल पण मुंबईत राहिले असावेत. पण, बाकी ठाकरे कुटुंबाने या प्रसंगात युती मन:पूर्वक निभावली. भाजपतील मवाळपंथीय या प्रसंगानंतर 
अखेर ते आमचे भाऊच आहेत असे सांगू लागले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com