Kanhayya Kumars Program on Monday in Nashik | Sarkarnama

नाशिकमध्ये सोमवारी कन्हैय्याकुमारचा 'सवाल पुछो' कार्यक्रम 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, विचारवंत गोविद पानसरे यांच्या हत्येच्या रेंगाळलेल्या तपासावरुन वातावरण तापवले जात होते. या पार्श्‍वभूमीवर नुकतेच कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडे शस्त्रसाठा सापडला. दाभोलकर हत्येशी संबंधीत सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर कन्हैय्याकुमारचा नाशिक दौरा होत आहे. 

नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे यांची अटक चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. 20) जे. एन. यु. विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार नाशिकला युवकांच्या उपस्थितीत 'निर्भय बनो...सवाल पुछो' कार्यक्रमात सहभागी होणार आहे. शहरातील डाव्या विचारसरणीच्या सेहेचाळीस संघटनांनी कार्यक्रम आयोजित केल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, विचारवंत गोविद पानसरे यांच्या हत्येच्या रेंगाळलेल्या तपासावरुन वातावरण तापवले जात होते. या पार्श्‍वभूमीवर नुकतेच कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडे शस्त्रसाठा सापडला. दाभोलकर हत्येशी संबंधीत सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा दौरा होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेंत त्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यात युवकांसाठी निर्भय बनो...सवाल पुछो हा कार्यक्रम होणार आहे. 

कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकार, नेते कन्हैय्याकुमारच्या निशाण्यावर असतील. हा कार्यक्रम दोन आठवड्यापूर्वीच निश्‍चित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाला परवानगी देतांना तो बंदीस्त सभागृहात ठेवण्याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे. आता या कार्यक्रमाची परवानगी रद्द करता येणार नसल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. याबाबत संयोजकांशी संपर्क करुन त्यांनी विविध सुचना दिल्या आहेत. 
 

संबंधित लेख