kanhaya kumar rally nagar | Sarkarnama

नगरला कन्हैयाकुमारची सभा होणारच ! 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नगर : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संसदेतील माजी अध्यक्ष व आघाडीचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांच्या सभेला भाजप युवा मोर्चाने विरोध दर्शविला. त्यामुळे सभा घेण्यावर ठाम असणाऱ्या डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. नियोजित जागेवरच सभा होईल. आंबेडकरी जनतेसह डाव्या संघटना सभेला संरक्षण देतील, असा निर्धार शहीद भगतसिंग यांच्या विचारांचा वारसा जपत असलेल्या संघटनांनी केला आहे. 

कन्हैयाकुमारची सभा नियोजित ठिकाणी होणारच, असे भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे राज्य सचिव सुभाष लांडे व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अजय साळवे यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला. 

कन्याकुमारी ते पंजाब असा लॉंग मार्च 15 जुलैपासून कन्हैयाकुमार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला आहे. रविवारी (ता. 6) सायंकाळी या लॉंग मार्च रॅलीचे नगरला आगमन होणार आहे. औरंगाबाद रस्त्यावरील सिटी लॉन्स येथे कन्हैयाकुमार यांची सभा होणार आहे. दरम्यान, शहरातील काही संघटनांनी या सभेस विरोध दर्शविला आहे. सभेच्या नियोजनासाठी डाव्या संघटनांची सिटी लॉन येथे बैठक झाली. 

सभेला विरोध करणे चुकीचे असून, कन्हैयाकुमार जातीय व धार्मिक सलोख्यासाठी संघर्ष करीत आहे. युवक, विद्यार्थी, दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक वर्गाचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ते मोफत व समान मिळावे, हाच सभेचा विषय आहे. ही सभा वादाचा विषय नसून, प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे गट-तट विसरून सभेला संरक्षण देण्याचा निर्धार डाव्या संघटनांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता सभेला परवानगी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सभा नियोजित ठिकाणीच होणार ः लांडे 
प्रशासनाने रात्री उशिरा परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यापासून रॅली सुरू होईल. सायंकाळी सहा वाजता नियोजित ठिकाणीच सभा होईल. त्यासाठी डाव्या विचारसरणीच्या संघटनेचे कार्यकर्ते संरक्षण देणार आहेत, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव सुभाष लांडे यांनी दिली. 

आंबेडकरी जनता संरक्षण देईल ः साळवे 
कन्हैय्याकुमारच्या सभेला कोणीही विरोध करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठीच त्यांचा लढा आहे. त्यामुळे या सभेला कोणी विरोध करीत असेल, तर आंबेडकरी जनता संरक्षण देईल. सभा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अजय साळवे यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख